मोठी बातमी...केंद्रीय मंत्री राणे यांच्या अटकेची चर्चा... नाशिक पोलिसांचे पथक रवाना

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची चर्चा... नाशिक पोलिसांचे पथक रवानानाशिक : भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुंबई आणि कोकण पट्टा पिंजून काढणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. राणेंचा मुक्काम सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये असून त्यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. टिव्ही ९ ने याबाबतचं वृत्त दिले आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे अटक केल्यानंतर उपराष्ट्रपतींना कळवलं जावं. अटकेची माहिती भारत सरकारला द्यावी. कारवाईवेळी राजशिष्टाचाराचं पालन करा, हक्कभंगाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आदेश नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post