जन आशिर्वाद यात्रेत राणेंना 'या' ठिकाणी जाऊ देणार नाही!, शिवसेना आक्रमक

 राणेंची जन आशिर्वाद यात्रा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापासून.... शिवसेनेचा तीव्र विरोधमुंबई : भाजपाच्या वतीने नव्याने केंद्रात मंत्री झालेल्या नेत्यांची जन आशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्या मुंबईच्या दौऱ्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. मात्र नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. नारायण राणे सारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी ज्याने बेईमानी केली असा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट शिवसैनिक देऊ देणार नाहीत. शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत यांची नारायण राणेवर टीका. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post