राखी सावंतची भर रस्त्यात 'भालाफेक'.... एकाच डोकं फुटलं

 राखी सावंतची भर रस्त्यात 'भालाफेक', नीरज चोपडा याच्या यशापासून प्रेरणामुंबई:  टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा  याने सुवर्णपदक पटकावलं. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रिटीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नीरजचं कौतुक करत आहेत.  राखी सावंतलाही भालाफेकचं वेड लागलं आणि रस्त्यावरच सराव करताना दिसली. या नादात तिने एकाचं डोकंही फोडलं.

राखी सावंत तिच्या विचित्र व्हिडिओमुळे कायम चर्चेत असते. सध्या राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात ती भालाफेकीचा सराव करताना दिसते आहे. राखी मुंबईच्या रस्त्यावर एक काठी घेऊन भालाफेकीची प्रॅक्टिस करताना दिसत आहे.  राखीने काठी फेकल्यानंतर तिचा नेम चुकला आहे. समोरून  'हे काय चाललं आहे' असा आवाज येतो आहे. राखीने फेकलेली ही काठी एका व्यक्तीच्या डोक्यावर जाऊन बसली. राखीने भालाफेक सरावाच्या नादात एकाचं डोकं फोडलं. म्हणजे तसं त्या व्यक्तीला फार लागलं असं नाही तर हा एक मजेशीर व्हिडीओ आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post