नगर शहर व परिसरात पावसाची संततधार, सीना नदीला पूर.....video

नगर शहर व परिसरात बारा तासांपासून पावसाची संततधार, सीना नदीला पूर, कल्याण रोडवरील वाहतूक ठप्प



 नगर: दीर्घ विश्रांती नंतर पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. नगर शहरासह परिसरात काल रात्री पासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून रात्रभर संततधार पाऊस चालू आहे. सकाळीही पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. 



शहर परिसरातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान जेऊर परिसरात उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. राहुरी तालुक्यातही रात्री पासून पावसाची संततधार सुरू आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post