'बाळू'ने बिबट्याशी झुंज देत मुलांना दिले जीवदान....ईमानी श्वानाचा वाढदिवस साजरा


पद्मश्री राहीबाईंच्या 'बाळू'ने बिबट्याशी झुंज देत मुलांना दिले जीवदान....ईमानी श्वानाचा वाढदिवस साजरानगर: बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आपल्या 'बाळू' नावाच्या कुत्र्याचा नुकताच वाढदिवस साजरा केला.

वाढदिवस साजरा करण्याचे विशेष कारण म्हणजे गेली दहा वर्ष बाळू पद्मश्री राहीबाई यांना वेळोवेळी साथ देत आलेला आहे .अनेकदा त्याने घरातील लहान मुलांवर बिबट्याचा होणारा हल्ला थोपवला आहे तसेच तो परतवून लावलेला आहे .त्यामुळे बाळू कुटुंबातील सर्वांचाच अत्यंत लाडका आणि विश्वासू मानला जातो. याच बाळू वर गेल्या सहा महिन्यात पाच वेळा बिबट्याने हल्ला केल्याचे सांगितले जाते. नुकतेच बाळूला बिबट्याने आपले लक्ष्य बनवले होते. बिबट्या बाळूला पकडून रात्रभर जंगलात घेऊन गेल्यानंतर बाळू त्यातून  प्राण वाचतात आपली मालकीण पद्मश्री राहीबाई यांचे घर पुन्हा गाठले. 

रात्रभर वाघाच्या ताब्यात असलेला बाळू सुखरूप घरी आल्याचे बघून कुटुंबातील सर्व सदस्यांना अत्यंत आनंद झाला. दहा वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे दिलेली सेवा व अनेकदा बिबट्याने हल्ला करूनही आपले व कुटुंबातील सदस्यांचे प्राण वाचवलेल्या बाळू बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य सरसावले. कुटुंबातील सर्वांनी एकत्र येत बाळूला मिळालेल्या जीवदानाचा आनंद त्याचा वाढदिवस साजरा करत व्यक्त केला‌

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post