आलिशान बंगला,‌‌‌‌‌महागड्या गाड्यांमध्ये गावठी दारूचा बेकायदा साठा, महिलेसह दोघे ताब्यात


आलिशान बंगला,‌‌‌‌‌महागड्या गाड्यांमध्ये गावठी दारूचा बेकायदा साठा, महिलेसह दोघे ताब्यात  पुणे : आलिशान बंगल्यात ‌ महागड्या  कारमध्ये गावठी दारुचा  बेकायदेशीरपणे साठा करणाऱ्या एका महिलेसह दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक  केली आहे. गावठी दारुचे ६० प्लॅस्टिक कॅन असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने  आरोपीस ६ ऑगस्टपर्यंत पोलिस  कोठडी सुनावली  आहे.

बावधन बुद्रुक  ​याठिकाणी गुरूवारी ही कारवाई करण्यात आली आहे. विवेक मुकुटसिंग रजपूत (वय- ४१) रा. बावधन बुद्रुक, बिंदीया अनिल राजपुत (वय- ४६) रा. बावधन बुद्रुक असे अटक करण्यात आलेल्या  आरोपींचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बावधन बुद्रुक गावाच्या हद्दीमध्ये फ्लेम कॅम्पस रस्त्यावर शेजारील एका बंगल्यात गावठी दारुचा बेकायदेशीरपणे साठा केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, पथकाने गुरूवारी बावधन बुद्रुक मधील क्षत्रीयनगर येथील त्रिशा बंगल्यामध्ये छापा मारण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post