१५ रुपयांचा वडापाव खायला गेली आणि ८ लाख गमावले....

 १५ रुपयांचा वडापाव खायला गेली आणि ८ लाख गमावले....पुणे : वडापाव आवडत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. पुण्यात एक अशी घटना समोर आली आहे ज्यात एका महिलेला वडापाव खाण्याच्या इच्छेपायी तब्बल 8 लाखांचा फटका बसला आहे. सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली बॅग कारमध्येच ठेवून वडपाव आणण्यासाठी गेलेल्या महिलेची बॅग चोरट्यांनी लंपास केली आहे. त्यात तब्बल 8 लाखांचा ऐवज होता. 24 ऑगस्टला संध्याकाळी सातच्या सुमारास धनकवडी  इथल्या अहिल्यादेवी चौकात ही घटना घडली आहे. 

पुण्यातील 35 वर्षीय महिला रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाला राखी बाधण्यासाठी गेल्या होत्या. भावाला राखी बाधल्यानंतर त्यासंध्याकाळी आपल्या कारने घरी परतत होत्या. सहकारनगर परिसरातल्या अहिल्यादेवी चौकात आल्यावर त्यांना वडापाव खाण्याची इच्छा झाली. तेव्हा एका वडापावच्या दुकानासमोर त्या वडापाव घेण्यासाठी थांबल्या.

त्यांच्या गाडीत सोन्याचे दागिणे आणि काही रोकड असणारी एक बॅग होती. कारमधून उतरत असताना त्यांनी ही बॅग डाव्या बाजूच्या सीटवर ठेवली आणि त्या वडापाव घेण्यासाठी उतरल्या. यादरम्यान चोरट्यांनी संधी साधली आणि कारमध्ये ठेवलेली बॅग घेऊन धूम ठोकली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post