क्रूरता..चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या...

 

क्रूरता..चारित्र्यावर संशय घेऊन  पत्नीची हत्या...पुणे: चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोयत्याने वार करुन पती राहुल प्रतापे याने पत्नी गौरीला संपवलं. पिंपरी चिंचवड मधील पुनावळे भागात मंगळवारी रात्री ही घटना घडली. आरोपी पती हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात आहे.

आरोपी राहुल प्रतापे हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. पत्नी गौरीच्या चारित्र्यावर तो सतत संशय घेत होता. त्यातून दोघांमध्ये वारंवार खटकेही उडायचे. मंगळवारी रात्रीही चारित्र्याच्या संशयावरुन राहुलने गौरी हिच्याशी भांडण केले. त्यानंतर चिडून तिच्यावर कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या गौरीचा मृत्यू झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post