'सिरम'चे पुनावाला म्हणतात...लसीचा प्रभाव ६ महिन्यात कमी होतो..

 

लसीचा प्रभाव ६ महिन्यात कमी होतो....तिसरा डोस गरजेचा पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असला तरी कोरोना लसीचा तुटवडा भासत असल्यामुळे लसीकरण मोहीम अधिक प्रभावी होताना दिसत नाही.  सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पुण्यात जास्त कोरोना आहे, इथं लस द्या असं केंद्र सरकारला सांगितलं, पत्रही लिहिलं, पण मोदी सरकार त्याचं उत्तरच देत नाही, अशी प्रतिक्रिया सायरस पुनावाला यांनी दिली आहे. लॉकडाऊन लावला नाही तर हर्ड इम्युनिटी तयार होते. 6 महिन्यानं लसीचा प्रभाव कमी होतो म्हणून बुस्टर डोसची गरज आहे. कदाचित त्यानंतरही लसीचा डोस घ्यावा लागू शकतो, असं पुनावाला म्हणाले. आम्ही वर्षाला 110 कोटी लस बनवू शकतो, त्यापेक्षा जास्त लस बनवू शकत नाही. इतर कंपन्या किती लस बनवतात हे माहिती नाही. त्यावरुन तुम्ही गणित करा आणि बघा की राजकारणी किती थापा मारत आहेत, असा गंभीर मुद्दाही पुनावाला यांनी उपस्थित केलाय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post