जिल्ह्यात लाच प्रकरणात पोलिस हवालदार 'एसीबी'च्या जाळ्यात

 

नगर जिल्ह्यात लाच प्रकरणात पोलिस हवालदार 'एसीबी'च्या जाळ्यातनगर: श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारास दोन हजार रुपयाची लाच  घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचुन ही कारवाई केली.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन वार्ड क्र. 3 च्या बीट चौकीवर नेणुकीस असलेले संजय काळे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. या घटनेने पोलीस वार्तुळात खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांचे नातवावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या भा. दं. वि. कलम 392 च्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व चार्जशिटसाठी संजय काळे यांनी तक्रारदाराकडे 2000 रपयांची लाचेची मागणी केली होती. ही रक्कम श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमधील बिट चौकी न 3 चे कार्यालय येथे स्विकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post