देशाचा स्वातंत्र्य दिन, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारावर थोर व्यक्तीमत्वांच्या एकमेवाव्दितीय पेन्सिल चित्रावरील धूळ स्वतः साफ करण्याची वेळ.... video

 

देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारावर थोर व्यक्तीमत्वांच्या पेन्सिल चित्रावरील धूळ स्वतः साफ करण्याची वेळ
नगर(सचिन कलमदाणे): उद्या देश आपल्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे.स्वातंत्र्याच्या लढाईत आहुती देणाऱ्या वीरांचे स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस. मात्र याच वीरांचे हुतात्म्यांचे एकमेवाद्वितीय असलेले स्मारक धूळखात आहे.हे पाहिल्यावर उद्दिग्न झालेले चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी चक्क हातात   झाडू घेत हे पेन्सिल स्केच साफ केले.


अहमदनगर येथील महावीर कलादालनात 25 वर्षांपूर्वी चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 70 बाय 20 फूट आकाराच्या दर्शनी भिंतीवर भारतमाता आणि तिच्या 501 सुपुत्रांचे पेन्सिल स्केच तयार करण्यात आले आहेत.या साठी कांबळे यांना काही महिने खर्च करावे लागले आहेत.भिंतीवर तयार झालेली ही प्रतिकृती जगातील एकमेवाद्वितीय म्हणावी लागेल .देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाकडे वाटचाल करत असताना या चित्रांची दुर्दशा न पहावल्याने कांबळे यांनी स्वःत हातात झाडू घेऊन स्वच्छ केले.

याबाबत प्रमोद कांबळे यांनी संगीतले की,मला या चित्रांवर जाळे तयार झाल्याचे नागरिकांनी सांगितले.अनेक लोक या महावीर कलादालनात हे चित्र पहावयास जातात.मात्र त्यांची निराशा होते.सध्या ही वास्तू महानगरपालिकेच्या ताब्यात असल्याने तिकडे कोणी लक्ष देताना दिसत नाही.म्हणून मी स्वतः हे साफ करण्याचे ठरवले.उद्या या चित्राला पाहायला येणाऱ्या नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल.

एका चित्रकाराला अदभुत कलाकृतीचे रक्षण करण्यासाठी उद्दिग्न होऊन स्वतः सर्व साफ करण्याची वेळ येते हे लाजिरवाणे आहे.प्रशासनाने या अमूल्य ठेवा जपण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

Video bite प्रमोद कांबळे
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post