खळबळजनक... पतसंस्थेच्या व्यवस्थापकावर गोळीबार करून ५ लाख लांबविले

 

नगर जिल्ह्यात खळबळ... पतसंस्थेच्या व्यवस्थापकावर गोळीबार करून ५ लाख लांबविलेनगर: पारनेर तालुक्यातील पारनेर  ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या बेलवंडी फाटा शाखेचे अधिकारी बाळासाहेब रामचंद्र सोनवणे (रा. सोबलवाडी) यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. शाखेतून पाच लाख रुपयांची चोरी करताना चोरट्यानी गोळीबार केला. 

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फाटा येथे पारनेर ग्रामीण  पतसंस्थेचे व्यवहार आज सकाळी सुरू झालेले होते. दुपारी दोनच्या सुमारास या ठिकाणी गाडीवरून एक जण आला होता. त्याने पतसंस्थेमध्ये प्रवेश करत पतसंस्थेमधून पाच लाख रुपये घेऊन पळून जात असताना शाखा व्यवस्थापक यांनी त्याला ती रक्कम नेण्यास मज्जाव केल्यानंतर संबंधित चोरट्याने त्याच्या हातामध्ये असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी व्यवस्थापकाच्या दिशेने झाडली. या घटनेमध्ये सोनवणे हे गंभीर जखमी झाले आहेत. 

 सदरची घटना घडल्यानंतर सुपासह श्रीगोंदा तालुक्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यातच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी घटनास्थळी धाव घेतली असून विशेष पथक सुद्धा आरोपीच्या शोधार्थ पाठविले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post