चंद्रकांत पाटील यांचे शरद पवार यांना 'ओपन चॅलेंज'

 शरद पवारांच्या भूमिकेनंतर चंद्रकांत पाटील यांनी दिले खुले आव्हानकोल्हापूर : ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणावरून राज्यभर बाजू मांडण्यासाठी राज्यभर सभा घेणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.मात्र जनतेला खोटं सांगण्यासाठी पवार साहेब सभा घेत असतील तर त्यांच्या पाठोपाठ राज्यभर भाजपकडून पोलखोल सभा देखील घेतल्या जातील,  असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. 


'खोटं बोल पण रेटून बोलं' याप्रमाणे शरद पवार केंद्राकडे बोट दाखवत बचाव करत आहेत. मात्र 16 वर्षे सोडली तर अनेक वर्षे केंद्रात आणि राज्यात देखील यांची सत्ता होती.  मग त्यावेळी घटनादुरुस्ती का करून घेतली नाही? असा सवाल चंद्रकांतदादा पाटील यांनी विचारला आहे.  देवेंद्र फडणवीस सरकारने जे आरक्षण टिकवले होते ते आरक्षण यांना टिकवता आले नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची यांची अजिबात इच्छा नाही, त्यामुळे शरद पवार अशी विधाने करत असल्याचे देखील चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे. याआधी मी 28 वेळा याबाबत बोललो आहे, मात्र आज पुन्हा एकदा शरद पवार खोटे बोलले आहेत त्यामुळे मला माध्यमांच्यासमोर यावं लागलं आहे असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post