राणेंच्या अटकेसाठी बड्या मंत्र्याचा पोलिसांवर दबाव, व्हायरल व्हिडिओनंतर भाजप जाणार कोर्टात

 

नारायण राणेंच्या अटकेसाठी बड्या मंत्र्याचा पोलिसांवर दबाव, व्हायरल व्हिडिओनंतर भाजप जाणार कोर्टातमुंबई : उद्धव ठाकरे यांच्यबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांना जामीन मंजूर झालाय. राणेंच्या जामिनानंतर आता भाजप नेत्यांकडून हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले जात आहे. तसेच भाजप नेते राज्य सरकारवर सडकून टीका करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी तर हे राज्य गुडांच्या मदतीने सुरु असल्याचा आरोप करत मंत्री अनिल परब यांना कोर्टात खेचणार असल्याचे सांगितले. राणे यांना अटक करण्यासाठी दबाव टाकला जात होता, अशी चर्चा सुरु झाल्यानंतर चंद्रकांत पाटील  यांनी वरील माहिती दिली

सत्ता अकृत्रिमपणे मिळवली त्या सत्तेची एवढी नशा कशाला. यांचं हम करेसो कायदा असं सुरु आहे. हे प्रत्येक विषयावर थपडा खातात. अनिल परब यांना आम्ही कोर्टात खेचणार. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. याच आधारे आम्ही कोर्टात जाणार आहोत. एका मिनिस्टरला हे अधिकार दिले आहेत का ? सिक्रेट कॉल त्यांनी कव्हर केला. बाकी फोर्स वाढवा. काही करुन अटक करा. कसली ऑर्डर मागताय ? कशाला डिले करताय ? असं ते म्हणताना दिसतायत,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली आहे, असा आरोपदेखील त्यांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post