पालकमंत्री मुश्रीफ यांच्या आढावा बैठकीसाठी राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित, भाजप पदाधिकार्यांना रोखले, आ.मोनिका राजळे संतप्त

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आढावा बैठकीसाठी राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित, भाजप पदाधिकार्यांना रोखले, आ.मोनिका राजळे संतप्त
 नगर :  जिल्ह्याचे‌ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज  पाथर्डी येथील सांस्कृतिक भवन येथे आढावा बैठक घेतली. मात्र ही बैठक सुरु असतांना भाजप आमदार मोनिका राजळे आणि भाजप पदाधिकऱ्यांना आत प्रवेश नाकारल्याने वाद निर्माण झाला.

 बैठकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आत प्रवेश देण्यात आला होता.   आढावा बैठकीसाठी आलेल्या सभापती सुनीता दौड, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, भाजपचे नेते पुरुषोत्तम आठरे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, भाजप तालुका अध्यक्ष माणिक खेडकर  सुनिल ओव्हळ यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना आत जाण्यास पोलिसांनी रोखले. आमदार मोनिका राजळे तिथे दाखल झाल्या. यावेळी प्रशासनाला जाब विचारुन आमदार राजळेंनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी पदाधिकाऱ्यांना आत येण्यास परवानगी दिली. त्यानंतर आमदार मोनिका राजळे यांच्या समवेत आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री यांच्या समोर ठिय्या दिला. 


दुबार पेरणीचे संकट, कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव, सततचे लॉकडाऊन, विजेचा लपंडाव अशा कित्येक समस्या सर्वसामान्य नागरीक, शेतकरी, छोटमोठे व्यापारी, मजुर यांच्या आहेत.त्याच समस्या मांडण्यासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांना बैठकीस प्रवेश न देणे निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया आ.मोनिका राजळे यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post