तहसीलदार देवरे स्वतः अधिकार्यांच्या मदतीने करतायत नागरिकांची कामे, कर्मचारी संपाचा नागरिकांना त्रास होऊ देणार नाही.....

 

तहसीलदार ज्योती देवरे स्वतः अधिकार्यांच्या मदतीने करतायत नागरिकांची कामे, कर्मचारी संपाचा नागरिकांना त्रास होऊ देणार नाही.....नगर: पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मनमानी व दडपशाही धोरणाच्या विरोधात महसूल कर्मचार्‍यांनी 25 ऑगस्टपासून काम बंद आंदोलन करत संप केला आहे.

तर दुसरीकडे नागरिकांची कुठलीही कामे अडू नये म्हणून स्वतः तहसीलदार देवरे यांच्यासह नायब तहसीलदार व इतर अधिकारी नागरिकांची कामे मार्गी लावत आहेत. 

महसुलचे कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन सुरू असून नागरिकांचे कामे अडून राहतील असा गैरसमज नागरिकांच्यात असून तसे काही न होता आम्ही स्वतः तहसीलदार, नायब तहसीलदार नागरिकांचे कामे मार्गी लावत आहोत. नागरिकांची कुठलीच कामे प्रलंबित राहणार नाही. नागरिकांनी गैरसमज करू नये. कोणाची काही कामे असल्यास माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार देवरे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post