नगरकरांना दिलासा...जुन्‍या दराप्रमाणेच कर आकारणी...

 सर्व्‍हेक्षण करून कोणतीही भाडेवाढ करण्‍यात येवू नये असा ठराव पारित - मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे      अहमदनगर महानगरपालिका आज रोजीच्‍या महासभेमध्‍ये प्रशासनाकडून शहरातील इमारतीचे (मालमत्‍ता मिळकत) रिव्‍हीजन (सर्व्‍हेक्षण) करून भाडेवाढ करण्‍याचा प्रस्‍ताव ठेवण्‍यात आला होता. शहरातील इमारतीचे (मालमत्‍ता मिळकत) रिव्‍हीजन केल्‍यास मनपाच्‍या उत्‍पन्‍नात भर पडणार आहे. रिव्‍हीजन केल्‍यास नविन इमारतीपासून व वाढीव बांधकामाचे मालमत्‍ता आकारणीमुळे मनपास उत्‍पन्‍नात वाढ होईल. या बाबत कोणत्‍याही मालमत्‍तावर दरवाढ करण्‍यात येणार नाही असे ठराव मांडण्‍यात आलेला आहे. जुन्‍या दराप्रमाणे मोजमाप घेण्‍यात आलेल्‍या इमारतींना (मालमत्‍ता मिळकत) आकारणी करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे नागरिकांना कोणत्‍याही प्रकारचे तोषिश लागणार नाही. त्‍यामुळे नागरिकांन मध्‍ये करामध्‍ये भाववाढीबाबत जो समज झालेला आहे. तो महासभेने नामंजूर केलेला आहे. नागरिकांना जुन्‍या दराप्रमाणेच आकारणी करण्‍याचे प्रशासनाला आदेश देण्‍यात आलेले आहे. मनपा हद्दीतील संपूर्ण शहरातील मालमत्‍ताचे मोजमाप घेतल्‍यानंतरच त्‍या मालमत्‍तांना आकारणी होणार आहे. सदयस्थितीत आहे त्‍याच इमारतींना (मालमत्‍ता मिळकत) जुन्‍या दराप्रमाणेच आकारणी सुरू राहणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्‍यावी असे मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी दिलेल्‍या प्रसिध्‍दी पत्रकात म्‍हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post