चुकूनही उचलू नका 'असे' कॉल, होईल मोठी फसवणूक..., दूरसंचार विभागाचा अलर्ट

चुकूनही उचलू नका असे कॉल, दूरसंचार विभागाचा अलर्टनवी दिल्ली:  सध्या अनेकांना मोबाईलवर  फसवणूक करणारे कॉल येतात आणि अनेकदा याला बळी पडून लोक त्यांचं मोठं नुकसान करून घेतात.  ऑनलाईन फ्रॉडसाठी फ्रॉडस्टर्स अनेक नवीन मार्गांचा वापर करतात. अनेकदा परदेशातून वेगळ्याच क्रमांकावरून कॉल येत असतात. आता तर 'नो नंबर (No Number)' म्हणजेच आपल्याला कॉल येतो, पण नंबर दिसत नाही, असाही कॉलचा प्रकार समोर आला आहे. आपल्या मोबाईलच्या स्क्रिनवर नंबरऐवजी 'No Caller ID' असं फक्त दिसून येतं. नागरिकांची याद्वारे मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत आहे. नागरिकांनी फसवणुकीच्या नवीन प्रकाराविषयी सतर्क राहण्याची गरज आहे. अन्यथा मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं.  त्याविषयी भारतीय दूरसंचार विभागाने नागरिकांना सतर्क केलं आहे. सर्व मोबाईल युजर्सना  DoT कडून एक मेसेज पाठवण्यात आला आहे. त्या मेसेजमध्ये असं लिहिलं आहे, जर आंतरराष्ट्रीय नंबरवरून भारतीय क्रमांकावर कॉल आला आणि तुमच्या डिस्प्लेवर भारतातील क्रमांक दिसला किंवा कुठलाच क्रमांक दिसला नाही तर त्वरित DoT च्या टोल फ्री नंबर 1800110420/1963 वर संपर्क साधावा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post