सावधान... नगर परिसरात विक्रीसाठी आलेली ही रोपं विकत घेताना काळजी घ्यावी.. निसर्ग प्रेमींचे आवाहन

 
सावधान..! सावधान..!

अहमदनगर शहर परिसर व राज्यातील विविध भागांत सध्या काही दिवसांपासुन - काही लोक ट्युलिप / गुलजारा /जरबेरा /कमळ अशा नावाने काही रोपे मोठ्या प्रमाणावर विकत आहेत.५०/- रूपयास एक व १००/- रूचे तीन रंगअशी सेटची किंमत असुन या रोपांना विविध रंगी फुले येतात असे सांगतात. वनस्पतीची खरी ओळख लपवण्यासाठी पाने पुर्णपणे कापुन तिथल्या फांद्यांवर रंग लावलेले आहेत.

वास्तविक ही लोकांची शुद्ध फसवणुक असुन ही वनस्पती ट्युलिप/गुलजारा/जरबेरा/कमळ नसुन ती जलपर्णी अर्थातच Water Hyacinth चे रोपे आहेत.काही ठिकाणी ही वनस्पती केंदाळ किंंवा जलकुंभी या स्थानिक नावानेही ओळखली जाते.या वनस्पतीला जांभळ्या रंगाची फुले येतात.तसेच मोठ्या नाल्यांमध्ये ही वनस्पती मुबलक प्रमाणात आढळुन येते.जलप्रदुषणाला ही वनस्पती कारणीभुत ठरते.या वनस्पतीमुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो व त्यामुळे पुरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोकाही निर्माण होवु शकतो.गोड्या पाण्याचे जलसाठे,नदी अथवा तलावांमध्ये ही वनस्पती वाढल्यास या वनस्पतीची वाढ थांबवणे खुप कठीण तर असतेच शिवाय हे अतिशय खर्चिक ही कामही आहे.अनेक भागात दरवर्षी शासनाचा लाखो रूपये निधी या वनस्पतीच्या तात्पुरत्या सफाईसाठी खर्च होत असतो.पाण्याचा संपुर्ण पृष्ठभाग या वनस्पतीमुळे पुर्णत: झाकला जातो ज्यामुळे सुर्यप्रकाश पाण्याखाली पोहचु शकत नाही व पाण्यातील आॅक्सिजन ही वनस्पती मोठ्या प्रमाणात शोषुन घेते ज्यामुळे पाण्यातील सजीव सृष्टी धोक्यात येते व पाण्यातील नैसर्गिक अन्नसाखळ्या नष्ट होवु लागतात.

या वनस्पतीची वाढ थांबवण्यासाठी किंवा यावनस्पतींना खाणारे नैसर्गिक किटक शोधण्याच्या अथवा काही विशेष उपाययोजना शोधण्याच्या उद्देशाने आम्ही गेल्या तीन वर्षांपासुन प्रयत्न करत आहोत त्यावर प्रयोग करण्यासाठी त्या वनस्पती आम्ही टबमध्ये वाढविल्या आहेत,परंतु अद्याप पर्यंत यश आलेले नाही.जलाशयांमध्ये वाढणारी ही वनस्पती पाण्याचे मोठ्या प्रमाणात शोषण करून सर्व जलाशय कमी कालावधीत व्यापुन कोरडेठाक करते.या वनस्पतीचा मुळ उगम विदेशात असुन या विदेशी वनस्पतीवर वाढणार्‍या किडीचे आस्तित्व आपल्या देशात नसल्याने तिचे नैसर्गिक रित्या नियंञण करणे खुप कठीण कार्य आहे.


तरी सर्व नागरीकांना नम्र विनंती की या वनस्पतीचे रोपे कुणीही खरेदी करू नयेत,चुकुन केल्यास हे रोप समुळ नष्ट करावे.आपल्या हलगर्जीपणामुळे अथवा चुकीमुळे ते निसर्गात पसरणार नाही याची काळजी  घ्यावी असे जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समुहातर्फे आवाहन करण्यात येत आहे.जागृक निसर्गप्रेमींनी ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी जेणेकरून लोक अनावधानाने यास बळी पडणार नाहीत व निसर्गाचा र्‍हास होण्यापासुन काही अंशी बचाव होईल.


जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समुह.

जयराम सातपुते

9604074796

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post