ऐतिहासिक सुवर्णवेध... भालाफेकमध्ये नीरज चोप्राने जिंकले सुवर्ण पदक


 ऐतिहासिक सुवर्णवेध... भालाफेकमध्ये नीरज चोप्राने जिंकले सुवर्ण पदक टोकयो : टोकयो ऑलिम्पिकमध्ये  भारताने इतिहास घडवला आहे. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या नीरज चोप्राने गोल्ड मेडल पटकावलं आहे. नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने तब्बल 87.58 मीटर भाला फेकला.  नीरजची ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. फायनलमध्ये दुसरा कोणताही खेळाडू नीरज चोप्राच्या जवळपासही आला नाही. नीरजचा एकट्याचा थ्रो 87 मीटरच्या पुढे गेला. चेक रिपब्लिकच्या जाकुब वैडेलीचचा थ्रो 86.67 मीटर आणि वितेस्लाव वेसलीचा थ्रो 85.44 मीटर एवढा गेला, त्यामुळे त्यांना अनुक्रमे सिल्व्हर आणि ब्रॉन्झ मेडल मिळालं.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post