धक्कादायक...अभ्यासासाठी सतत तगादा लावणर्या आईचा मुलीनेच केला खून...

धक्कादायक...अभ्यासासाठी सतत तगादा लावणर्या आईचा मुलीनेच केला खून...
 मुंबई: अभ्यास करण्यासाठी सतत तगादा लावणाऱ्या आईची मुलीनेच कराटेच्या कापडी पट्ट्याने गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना नवी मुंबईत घडली आहे.


नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर-7 मध्ये राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीने आपल्या आईची हत्या केली आहे. विशेष म्हणजे आपल्या आईची हत्या केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी आरोपी मुलीने बेडरुमचा दरवाजा आतून बंद करुन आईच्या मोबाईल फोनवरुनच नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविल्याचे देखील तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मुलीनेच आईचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुलीने दहावीत 92 टक्के गुण प्राप्त केले होते. त्यामुळे पालकांनी विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन मुलीला वैद्यकीय प्रवेशासाठी लागणाऱ्या नीट परीक्षेचा महागडा क्लास सुद्धा लावला होता. अनेक गोष्टीत पारंगत असलेल्या मुलीला स्वरक्षणासाठी कराटेचे धडे देखील दिले होते. मात्र, मुलीच्या अपेक्षा आणि स्वप्नांचा विचार न करता मुलीने डॉक्टर व्हावे, अशा इच्छेने आईचा जीव घेतला आहे. सातत्याने अभ्यासासाठी तगादा सहन न झाल्याने पोटच्या मुलीनेच आईला ठार मारले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post