मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांचा अनधिकृत बंगला जमीनदोस्त

 

मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांचा अनधिकृत बंगला जमीनदोस्तरत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील बंगला पाडण्याचं काम सुरु आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज या पाडकामाची पाहणी केली. सोमय्या हे जवळपास 15 मिनिटे नार्वेकरांच्या बंगल्याबाहेर उभे होते. प्रशासनाला मिलिंद नार्वेकरांविरोधात गुन्हा दाखल करायचा नव्हता म्हणून नार्वेकर यांना स्वत: बंगल्या पाडण्यास सांगितलं, असा आरोप सोमय्या यांनी यावेळी केलाय. मागील आठवड्यात मिलिंद नार्वेकर यांच्या घराबाबत किरिट सोमय्या यांनी प्रशासनाला इशारा दिला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचा दावाही सोमय्या यांनी केलाय. 

मिलिंद नार्वेकरांचा बंगला पाडला. आता पालकमंत्री अनिल परबांचे रिसॉर्ट मुख्यमंत्री केव्हा पाडणार? असा सवालही सोमय्या यांनी केलाय. मिलिंद नार्वेकर यांनी चोरी केली, लबाडी केली त्यामुळे केंद्राची टिम आली. मिलिंद नार्वेकर यांच्यावर बंगला अनधिकृत असल्याने त्यांचा बंगला पाडण्यासाठी दबाव आणला गेला असंही सोमय्या म्हणाले. तर शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या टीकेचाही सोमय्या यांनी समाचार घेतलाय. वैभव नाईक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हिमत असेल तर त्यांनी हरित लवादामध्ये खटला दाखल करावा, असं आव्हान किरिट सोमय्या यांनी शिवसेनेला दिलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post