ईडी, सीबीआयची चौकशी लावू.... मिलिंद नार्वेकर यांना धमकीचा मेसेज

 

ईडी, सीबीआयची चौकशी लावू.... मिलिंद नार्वेकर यांना धमकीचा मेसेजमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सअप मेसेज पाठवून मिलिंद नार्वेकर यांना धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू अशी धमकी या व्यक्तीने मेसेजमध्ये दिली आहे. दरम्यान या मागण्यांसंबधी कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

 मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून यासंबंधी तपास केला जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post