15 हजारांची लाच, तहसीलदार 'एसीबी'च्या जाळ्यात

 15 हजारांची लाच, तहसीलदार 'एसीबी'च्या जाळ्यात


रायगड : कुळ असलेल्या जमिन विक्रीकरीता 32 ग प्रमाणपत्राची तक्रारदाराने मागणी केली असता तहसीलदारांनी 15 हजाराची मागणी केली होती. त्यानुसार लाच स्वीकारताना मुरुडचे तहसीलदार गमन गावीत यांच्यासह कर्मचाऱ्याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबधंक विभागाने अटक केली. 

जमिन विक्रीसाठी त्यावर असलेले कुळ वहिवाकीचे 32 ग प्रमाणपत्रासाठी मुरुड तहसीलदरांकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मुरुड तहसीलदार गमन गवित यांनी 15 हजारांची लाच मागि


तली.

याबाबत तक्रारीची खातरजमा करुन लाचलुचपत प्रतिबधंक विभागाचे पोलीस निरिक्षक शिवराज बेंद्रे याच्यासह पथकाने दि. 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता मुरुड तहसीलदार गमन गावीत यांच्यासह कर्मचाऱ्याला पकडले. संध्याकाळी उशीरा पर्यंत याबाबत कारवाई सुरु होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post