...तोपर्यंत हारतुरे, फेटे नाही, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा 'पण'

 

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हारतुरे, फेटे नाही, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पणबीड : मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून, भाजप नेत्या पंकजा मुंडे या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी जाहीर भाषणामधून जोपर्यंत मराठा आणि ओबीसी समाजाच्या, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तोपर्यंत हारतुरे आणि फेटा स्वीकारणार नाही. असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. बीडमध्ये आयोजित एका पक्षाच्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. 

पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या की, "मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत बीड जिल्ह्यानं नवा आदर्श घालून दिला पाहिजे. मी सांगते आजपासून कोणीही मला हार घालणार नाही. मी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत हारतुरे स्विकारणार नाही. त्यासोबतच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही. तोपर्यंत फेटा बांधनार नाही. समाज बंधावांनी मराठा-ओबीसी वाद लावणारांपासून सावधान होणं गरजेचं आहे. तसेच छत्रपती शिवरायांचा ​सामाजिक अभिसरणाचा आदर्श घेण्याची गरज आहे."  बीड शहरामध्ये जिल्ह्यातील बूथ कार्यकर्त्यांनी यांचे वर्कशॉप आयोजित करण्यात आलं होतं, या ठिकाणी पंकजा मुंडे बोलत होत्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post