स्व.अनिलभैय्या राठोड यांचा प्रथम स्मृतिदिन, आ.निलेश लंके, विक्रम राठोड यांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा

 स्व.अनिल राठोड यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


डॉक्टर होणार्‍या विद्यार्थ्यांना आ.निलेश लंके व विक्रम राठोड दत्तक घेणार     नगर - शिवसेना उपनेते व माजी मंत्री स्व.अनिल राठोड यांनी 25 वर्षे समाजसेवेच्या माध्यमातून राजकारणामध्ये आपला वेगळा ठसा निर्माण केला होता. गोर-गरीबांच्या प्रश्नांसाठी धावून जाणारा नेते होते. या नेत्याच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आमदार निलेश लंके प्रतिष्ठान व विक्रम राठोड यांच्यावतीने ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची इच्छा असणार्‍या 70 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलण्यात येईल. सातत्याने राजकीय जीवनात स्व.अनिल राठोड यांचे मार्गदर्शन आपणास मिळत असे, असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.


     माजी मंत्री स्व.अनिल राठोड यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या पुर्णाकृती वाल म्युरलचे अनावरण आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार दिपक पायगुडे, विक्रम राठोड, महापौर रोहिणी शेंडगे, विलास तुपे ,संभाजी दहातोंडे, बाळासाहेब बोराटे, अभिषेक कळमकर, संजय शेंडगे, सतीश मैड, मदन आढाव, गिरिष जाधव, दत्ता जाधव, परेश लोखंडे आदि उपस्थित होते.


     याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, आज स्व.अनिल राठोड यांना अभिप्रेत असलेले कार्य असेच पुढे चालू ठेवून गोर-गरिबांच्या शिक्षणाकरीता शिवसेना पाठिशी राहिल. स्व.राठोड यांना गोर-गरीबांचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवितांना काळ-वेळेच भान नसायचे. 24 तास उपलब्ध असलेला आमदार म्हणून त्यांची ख्याती होती. हीच परंपरा नगर शिवसेना पुढे चालू ठेऊ.


     पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शुभंकर कांबळे यांनी तयार केलेल्या वाल म्युरलचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभरात शिवालय येथे शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, स्नेहालयाचे गिरिष कुलकर्णी, सुहास मुळे, सुवेंद्र गांधी, किरण काळे, राजेंद्र गांधी, नगरसेवक नज्जू पहिलवान, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम, संभाजी कदम, अनिल बोरुडे, गणेश कवडे, सचिन शिंदे, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, स्मिता अष्टेकर, आशा निंबाळकर, राजेंद्र दळवी, पारुनाथ ढोकळे, अमोल ठाकूर, अर्जुन दातरंगे, अंबादास शिंदे, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, सुनिल लालबोंद्रे, रवी लालबोंद्रे, अरुणा गोयल आदिंसह शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी आदिंसह विविध पक्षाचे, संघटनांच्या मान्यवरांनी भेट देऊन अभिवादन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post