शेवगाव पाथर्डी तालुक्यात पावसाने हाहाकार....आ. मोनिका राजळे यांनी आपत्कालीन यंत्रणा केली कार्यान्वित

 शेवगाव पाथर्डी तालुक्यात पावसाने हाहाकार....आ. मोनिका राजळे यांनी आपत्कालीन यंत्रणा केली कार्यान्वित

नगर: पाथर्डी शेवगाव तालुक्यात पावसाने हाहाकार उडाला असून अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर आ.मोनिका राजळे यांनी प्रशासकीय यंत्रणा गतिमान केली असून पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

आ.राजळे यांनी  म्हटले आहे की,रात्री पासून शेवगाव_पाथर्डी तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असुन आखेगाव, कोरडगाव, पिपंळगाव, वाळुंज, वरुर-भगुर व इतर गावे पाण्याखाली गेली असुन अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.शासनास विनंती आहे की तातडीने मदतकार्य सुरू करावे.पूरग्रस्त नागरिकांना आव्हान करण्यात येते की घाबरून जावु नये आम्ही आपल्या समवेत आहोत शासकिय यंत्रणा आणि स्थानिक कार्यकर्ते आपल्या मदतीसाठी हजर असतील,मदतीसाठी जिल्हाधिकारी,प्रांत, तहीलदार यांच्या बरोबर चर्चा झाली असून आपतकालीन व्यवस्था तातडीने आपल्या मदतीसाठी येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post