खळबळजनक... लसीकरणावरून आ.निलेश लंके यांनी केली लिपिकाला मारहाण, महिला वैद्यकीय अधिकाऱ्यालाही शिवीगाळ

 खळबळजनक... लसीकरणावरून आ.निलेश लंके यांनी केली लिपिकाला मारहाण, महिला वैद्यकीय अधिकाऱ्यालाही शिवीगाळनगर:  पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी लसीकरणाचे काम करणार्या शासकीय लिपिकाला मारहाण करीत महिला वैद्यकीय अधिकारी यांना शिवीगाळ केल्याची तक्रार करण्यात आली आहे. सदर घटना दि. ४ऑगस्ट रोजी रात्री गटविकास अधिकारी व पोलिस निरीक्षक बळप यांच्या समोर घडली असून या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची व योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पारनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कडे केली आहे.

याबाबत दिलेल्या पत्रात वैद्यकीय अधीक्षक यांनी लिहिलं आहे की, 

अहमदनगर येथे दि.०४/०८/२०२१ रोजी रात्री ८:३० वाजता लसीचे टोकण वाटप करण्यासाठी  तहसिलदार व डॉ.आडसुळ यांच्या आदेशा नुसार लशीच्या लाभार्थ्यांना टोकण वाटप करण्यात आले.

तसेच रात्री १०:३० वाजता मा.आमदार व डॉ .कावरे यांनी टोकण वाटप करणारे  राहुल दिलीप पाटील, (कनिष्ठ लिपीक) यांना घरुन बोलवण्यात आले व त्यांच्यावरती टोकण विकण्याचे आरोप करुन त्यांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता आमदार निलेश लंके यांनी राहुल दिलीप पाटील,( कनिष्ठ लिपीक) यांना मारहाण केली.

तसेच कार्यरत महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.उंद्रे व डॉ अडसुळ यांना शिविगाळ करण्यात आली. सदर घटना गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक श्री.बळप यांच्या समोर घडलेला आहे.तरी सदर घटनेची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post