केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूरमहाड :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रात्री महाड महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी राणे यांची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने दोन्ही बाजूंने युक्तीवाद ऐकून राणेंना जामीन मंजूर केला आहे.

नारायण राणे यांना गोळवलीमध्ये अटक केल्यानंतर महाड इथं आणण्यात आले. त्यानंतर महाड न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी, राणे यांचे कुटुंबीय सुद्धा न्यायालयात हजर होते.

पोलिसांनी राणे यांची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. परंतु, नारायण राणे यांचे वकील अनिकेत निकम आणि भाऊ साळुंके यांनी युक्तिवाद केला. नारायण राणे यांचं वय आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

राणेंना कोणती औषधे सुरू आहेत याबाबत वकिलांनी न्यायालयात माहिती दिली. यासोबत प्रकृती पाहता जामीन द्यावा अशी विनंती केली आहे.  राणेंना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास आहे, यावर त्यांची औषध सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post