पैसे लाटण्यासाठी अजब फंडा... विवाहित असल्याचे लपवून श्रीमंत तरूणाशी लग्न, तिघांवर गुन्हा

 विवाहित असल्याचे लपवून दुसरा विवाह, तरूणाची  फसवणूक, महिलेसह तिघांवर गुन्हा



नगर: पती व दोन मुले असतानाही दुसरे लग्न करून तरुणाला एक लाखाला गंडा  घालणार्‍या तरुणीसह तिघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कावेरी शांती लिंगायत (वय 31 रा. सोलापूर) असे या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून न्यायालयाने 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

तिचे पंटर बसवराज (पूर्ण नाव माहिती नाही) व भारती रवींद्र झाडमुथ्या (रा. बीड) या दोघांवरही गुन्हा दाखल असून ते पसार झाले आहेत. याप्रकरणी सागर दिलीपलाल भंडारी (रा. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कावेरी लिंगायत या तरुणीचे पहिले लग्न झालेले होते. तिला दोन मुले आहेत. असे असतानाही तिने दोन पंटरच्या मध्यस्थीने फिर्यादी सागर भंडारी यांच्यासोबत लग्न केले. त्यांच्याकडून एक लाख रुपयांची रक्कम घेतली. परंतु, सागर यांना तिच्या पहिल्या लग्नाची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुर्गे  करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post