गोळीबाराच्या गुन्ह्यातून मुक्तता...माजी सरपंचाला घातली दुधाने आंघोळ

 गोळीबाराच्या गुन्ह्यातून मुक्तता...माजी सरपंचाला घातली दुधाने आंघोळपुणे : गोळीबाराच्या आरोपातून मुक्तता झालेल्या बारामतीमधील राष्ट्रवादीच्या माजी संरपंचाला  दुधाने अंघोळ घालण्यात आली आहे. या माजी सरपंचाचे नाव जयदीप तावरे असून ते माळेगाव या गावाचे सरपंच होते. पुण्याच्या मोक्का न्यायालायाने त्यांची मुक्तता केल्यानंतर ग्रामस्थ तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. 

मिळालेल्या माहितीनुसार 31 मे रोजी रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात चार आरोपींना अटक केले होते. मात्र, राजकीय आकसापोटी जयदीप तावरे यांच्यासह माळेगाव परिसरातील अनेकांची नावे यामध्ये गोवण्यात आली होती, असे सांगण्यात येतेय. जयदीप तावरे यांच्या अटकेनंतर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला होता.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post