दुसऱ्या कसोटीत भारताचा लॉर्डसवर ऐतिहासिक विजय, इंग्लंडवर १५१ धावांनी विजय

 दुसऱ्या कसोटीत भारताचा लॉर्डसवर ऐतिहासिक विजय, इंग्लंडवर १५१ धावांनी विजयलंडन : भारत आणि इंग्लंड  यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित सुटला. त्यानंतर ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात आज भारताने इंग्लंडवर 151 धावांनी मात करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या डावातील भारताच्या 364 धावांच्या बदल्यात इंग्लंडने 391 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर इंग्लंडच्या 27 धावांच्या आघाडीचा पाठलाग करत भारताने अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमीच्या अर्धशतकांच्या जोरावर 298 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर इंग्लंडला 60 षटकांमध्ये 272 धावांचं लक्ष्य दिलं. परंतु भारताने दिलेलं हे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवलेलं नाही. भारतीय गोलंदाजांनी 51.5 षटकांमध्ये अवघ्या 120 धावांत इंग्लंडचे सर्व फलंदाज बाद करत या रोमहर्षक सामन्यात विजय मिळवला आहे. भारताकडून या डावात मोहम्मद सिराजने 4, जसप्रीत बुमराहने 3, इशांत शर्माने 2 आणि मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली. दरम्यान, पहिल्या डावात शतक ठोकणाऱ्या लोकेश राहुलला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post