बिबट्याचा उपद्रव वाढला... शेतकऱ्याच्या ४ शेळ्या ठार

 

बिबट्याचा उपद्रव वाढला... शेतकऱ्याच्या ४ शेळ्या ठारश्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर खुर्द  येथे सुदाम नारायण शिंदे या गरीब शेतकऱ्याच्या चार दुभत्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला  करून ठार केल्या. बुधवारी  मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे शिंदे यांचे सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे.

प्रवरा पंचक्रोशीत बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात हल्ले वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी केसापूर  येथील शेतकरी उत्तम मेहेत्रे यांच्या केशव गोविंद बन परिसरात चालू गाडीवर बिबट्याने हल्ला केला होता. त्या हल्ल्यात मेहेत्रे बालंबाल बचावले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post