आरक्षण पूर्ववत झाल्यानंतरच राज्यात निवडणुका, पंकजा मुंडे यांची राज्य सरकारवर घणाघाती टीका


आरक्षण पूर्ववत झाल्यानंतरच राज्यात निवडणुका, पंकजा मुंडे यांची राज्य सरकारवर घणाघाती टीकालातूर: माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण जोपर्यंत पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू राहील,आरक्षण पूर्ववत झाल्यानंतरच राज्यात निवडणुका होतील अशी भूमिका लातूर येथे पार पडलेल्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींच्या महाजागर महामेळाव्याला संबोधित करतांना मुंडे यांनी मांडली.


यावेळी मंचावर आ.संभाजी पाटील निलंगेकर, आ.नरेंद्र पवार, आ.रमेश कराड, आ.अभिमन्यू पवार, खा.सुधाकर शृंगारे, राम शिंदे, योगेश टिळेकर, सुधाकर भालेराव, गोविंद केंद्रे, पाशा पटेल, राहुल केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. 


बहुजन समाजातील माणूस सामाजिक दृष्ट्या कुपोषित आहे, त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. मात्र पन्नास टक्क्यांपेक्षा जास्तीच्या आरक्षणाचा विषय असताना राज्य सरकारने इंपेरिकल डाटा सादर न केल्यामुळे पन्नास टक्क्यांच्या आत असलेले हक्काचे आरक्षणही गेले आहे. यामुळे ओबीसी समाजासमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य सरकारने तात्काळ इंपेरिकल डाटा तयार करावा व ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करावे, जोपर्यंत आरक्षण पुनर्स्थापित होणार नाही तोपर्यंत आरक्षणाचा लढा एकजुटीने लढू.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post