तहसीलदारांच्या खळबळजनक ऑडिओ क्लिपबाबात आ.निलेश लंके यांनी केला मोठा खुलासा

 

“तहसिलदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं बचावासाठी प्रयत्न”
नगर :  पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व त्या माध्यमातून निलेश लंके यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आ.लंके यांनी खुलासा केला आहे. निलेश लंके म्हणाले, “तहसीदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करून केविलवाणा प्रयत्न केला. ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेत. तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवला आहे. तहसीलदारांना सूचना केल्या तर त्यांनी मला देखील आत्महत्या करण्याचे मेसेज रात्री-अपरात्री केले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने बचावासाठी केलेला हा प्रयत्न आहे.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post