आमदार निलेश लंके यांची शेवगावमध्येही मोठी क्रेझ... ठिकठिकाणी जोरदार स्वागत

 आमदार निलेश लंके यांचे शेवगावमध्ये जोरदार स्वागतशेवगाव(संदीप देहाडराय): युवक हीच खरी समाजाची ताकद आहे. युवकांच्या पाठबळामुळेच आपण विधानसभेत पोहचू शकलो. त्यामुळे इतर कोणत्याही संपत्ती पेक्षा माझ्यासाठी हीच फार मोठी दैवी देणगी आहे. ती सर्वोतोपरी जपण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले. 

     आमदार लंके यांनी शेवगाव येथे विविध ठिकाणी सदिच्छा भेटी दिल्या. यावेळी ते बाजार समितीचे माजी सभापती संजय फडके यांच्या कार्यालयात ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण लांडे, संजय फडके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रोहण फडके, विजय धनवडे, सुभाष पवार, आकाश सुपारे, कृष्णा धनवडे, अभिषेक फडके, मुनाफ शेख, संकेत नवगिरे, प्रतीक ससाणे, ओमराजे वाळके, अलीम शेख आदी उपस्थित होते. 
    यावेळी आमदार लंके म्हणाले की, सर्वच क्षेत्रात तरुणांनी पुढे येवून आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवलेली आहे. कोरोना काळात व विविध सामाजिक उपक्रमात तरुणांच्या पुढाकारामुळे चांगले काम उभे राहीले आहे. तसेच समाजातील विविध घटकांना मदत झाली आहे. जुन्या जाणत्या, अनुभवी व ज्येष्ठ मार्गदर्शकांनी आता तरुणांना पुढे करुन त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. तरुणांनीही सामाजा प्रती जाणीव ठेवून पुढे येण्याची गरज आहे. 
   लंके यांचे शहर व ग्रामिण भागात ठिकठिकाणी फटाक्यांची आतीष बाजी करुन जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सनी देशमुख, शिवभक्त चंद्रकांत लबडे, प्रविण भारस्कर, प्रदिप काळे, संजय खरड, कानिफ ढाकणे आदींसह अनेकांनी सत्कार केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post