केडगाव ग्रामस्थांच्यावतीने कोकणातील पुरग्रस्तांना मदतीचा हात

 केडगाव ग्रामस्थांच्यावतीने कोकणातील पुरग्रस्तांना मदतीचा हात


केडगाव ग्रामस्थांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलला - आ. संग्राम जगतापनगर - मानवी जीवनावर गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे महाभयंकर संकट ओढवले आहे.यातच कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रात पूराने हाहाकार माजवला या पूराच्या प्रलयाने कोकण भागातील कुटुंब उध्वस्त झाले असताना, त्यांना खर्‍या अर्थाने आधाराची व मदतीची गरज आहे. केडगाव ग्रामस्थांच्यावतीने व भूषण गुंड यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
          केडगाव ग्रामस्थ,स्वराज्य संघर्ष प्रतिष्ठान व मुंजोबा तरुण मंडळाच्या वतीने कोकणातील पूरग्रस्तांसाठी विविध जीवनावश्यक वस्तू, किराणा सहित्य, अन्न-धान्य, स्वच्छता साहित्य, कपड्यांची मदत पाठविण्यात आली. यावेळी आ.संग्राम स्थायी समिती सभापती अविनाश घुले,भूषण गुंड, प्रा.माणिकराव विधाते,प्रा.अरविंद शिंदे,सा.कार्यकर्ते संभाजी पवार,उबेद शेख,विजय सुंबे,बच्चन कोतकर, गणेश सातपुते, सागर सातपुते,गणेश साळुंके,संकेत सातपुते, सुनील सातपुते, गणेश गिरे,सोहन कोतकर, उमेश कोतकर,विशाल निमसे,विकी रोहकले,वैभव गिरी,निलेश सातपुते, ऋषी कोतकर,प्रसन्ना कोतकर, अभिजीत कोतकर, नवनाथ कोतकर, दीपक गिरे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post