शिवालयातील 'स्व.अनिलभैय्या राठोड' यांच्या म्युरलसमोर शिवसैनिक झाले नतमस्तक.... शिल्पकार कांबळे यांनीही व्यक्त केल्या भावना

 

शिवालयातील 'स्व.अनिलभैय्या राठोड' यांच्या म्युरलसमोर शिवसैनिक झाले नतमस्तक.... शिल्पकार कांबळे यांनीही व्यक्त केल्या भावना
नगर-(सचिन कलमदाणे) : नगर शहराचे विधानसभेत सलग 25 वर्ष प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री अनिल राठोड यांचा प्रथम स्मृतिदिन 5 ऑगस्टला होता. यानिमित्त नेता सुभाष चौकातील शिवालयात स्व.अनिलभैय्या यांचे हुबेहूब वॉल म्युरल लावण्यात आले. शिल्पकार शुभंकर प्रमोद कांबळे यांनी बनवलेल्या या शिल्पाचे प्रत्येकाने तोंड भरुन कौतुक केले. या कामाबद्दल शुभंकरनेही सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. 'हे शिल्प कायम माझ्या मनात एक वेगळया जागी असेल' अशा भावना शुभंकरने व्यक्त केल्या आहेत.
शुभंकर कांबळे यांनी म्हटले आहे की,


विक्रमनी जेव्हा मला फोन करून सांगितलं की आपल्याला स्व. अनिल भैय्या राठोड यांचे शिल्प त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त बनवायचे आहे.... त्या वेळी खरं सांगायचं तर मला मनापासून वाईट वाटत होतं अणि त्यांची मूर्ती माझ्याकडुन साकारली जाईल का हा विचार मनामध्ये चालू होता... 

ज्या माणसाबरोबर माझे आणि माझ्या परिवाराचे अनेक वर्षांपासून इतके चांगले संबंध होते आणि ज्यांना मी लहान असतांना पासून ते मागील वर्षा पर्यंत पाहत होतो......अश्या व्यक्तीचे ते निघून गेल्या नंतर शिल्प साकारणे हे माझ्यासाठी अजिबात सोपे नव्हते. 

काम सुरू केल्या नंतर त्यांची बोलण्याची स्टाइल आणि त्यांचा खंबीर आवाज सारखा कानात ऐकू यायचा आणि याच आवाजाने त्यांचे शिल्प साकारण्यात मदत केली... 

सलग 25 वर्षे आमदार राहून लोकांसाठी 24x7 उपलब्ध असणारा माणूस म्हणजे 

स्व. अनिल भैय्या राठोड !! 

मी विक्रम आणि संपूर्ण राठोड परिवाराचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला हे शिल्प साकारण्याची संधी दिली.....मला अवगत असलेल्या कलेचा मी 100% वापर केला असून हे शिल्प कायम माझ्या मनात एक वेगळया जागी असेल...! 

धन्यवाद.

शिल्पकार - शुभंकर प्रमोद कांबळे. 


www.studiorangeen.in

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post