कल्याण रोड परिसरात रिक्षा पेटवली... परिसरात भीतीचे वातावरण

 कल्याण रोड परिसरात रिक्षा पेटवली... परिसरात भीतीचे वातावरणनगर:  कल्याण रोड परिसरात अज्ञाताने रात्री रीक्षा पेटविल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही समाजकंटकांकडून अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.


 अशा घटना शहरात वारंवार घडत असल्याने संबंधित आरोपींचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने रीक्षा पेटवून दिली. यात रीक्षाच्या सीटसह वरील छप्पर व मागील बाजू पूर्णत: जळून गेली असून सुमारे 40 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post