आमदार, खासदारांचा विकासाचा 'राजमार्ग' ! 'या' महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

 *राष्ट्रीय महामार्ग क्र 61, कल्याण फाटा ते अहमदनगर येथील सक्कर चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन*

 *खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले* नगर :  जिल्‍ह्याच्‍या दळणवळणाच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण असलेल्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61, कल्याण, अहमदनगर, नांदेड या राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या कामांचे भूमिपूजन आज (दि. 7) खासदार डॉ.सुजय विखे पाटील तसेच आमदार संग्राम जगताप यांच्‍या हस्ते करण्यात आले .

अहमदनगर शहरातील सक्कर चौक, नेप्ती चौक, रेल्वे ब्रीज पर्यंत रस्त्याची पाहणी खासदार डॉ सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी उपमहापौर गणेश भोसले , धनंजय जाधव, सुभाष लोंढे, वैभव वाघ ,अजय चितळे, राष्ट्रीय महामार्गाचे डी एन तारडे तसेच अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार डॉ विखे पाटील म्हणाले की, कल्याण फाटा ते सक्कर चौक आणि स्टेट बँक पासून ते चांदबिबी महाल अशा अंतराचे कामाच्या टप्प्याने पूर्ण केले जाणार असून या महामार्गाची अवस्था अत्यंत दुर्धर झाली असून यासाठी आपण केंद्र सरकार कडून ३५ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे तसेच आमदार जगताप यांनी या रस्त्यासाठी राज्य पातळीवर पाठपुरावा केला. महिन्याभरात रस्त्याचे काम पूर्ण होऊन नगर शहरातील वाहतुकी कोंडीचा प्रश्न सुटणार आहे असे खासदार डॉ विखे पाटील यांनी सांगितले.

आमदार जगताप म्हणाले की, कल्याण अहमदनगर महामार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे नगर शहरातील वाहतूक सुरळीत होईल काम लवकरात लवकर सुरू करून पहिल्या टप्प्यात सक्कर चौक ते नेप्ती चौक पर्यंत काम करावे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

महामार्गाच्या कामासाठी मंजुर झालेल्‍या या निधीतून कल्‍याण चौक ते सक्‍कर चौक ( ६.कि.मी) आणि स्‍टेट बॅकेपासून ते चॉदबेबी महाल ( १०.कि.मी), चॉदबेबी महाल ते मेहकरी ( ४. कि.मी) अशा अंतराचे काम टप्‍प्‍याटप्‍पयाने पुर्ण केले जाणार आहे. या मार्गाला निधी उपलब्‍ध झाल्‍याने मोठ्या शहरांना जोडणा-या वाहतूकीलाही मोठी मदत होवून जिल्‍ह्याच्‍या औद्योगिक क्षेत्रालाही या मार्गामुळे फायदा होईल या मध्ये प्रामुख्याने नगर शहरातील रेल्वे पुलापासून ते सक्कर चौक या भागातील रस्त्याचे डांबरीकरण  व रेल्वे पूल ते सीना नदी पत्रापर्यंत  काँक्रीट गटारच्या कामाचा समावेश करण्यात आले असल्याचे  खा.विखे पाटील सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post