निराधार मनोविकलांग महिलांना आधार देणारा मनगाव प्रकल्प मानवसेवेचे मंदिर

 जिव्हाळा ग्रुपने मनगाव प्रकल्पात साजरा केला स्वातंत्र्यदिन

निराधार मनोविकलांग महिलांना आधार देणारा मनगाव प्रकल्प मानवसेवेचे मंदिर : अल्पना कासवानगर : देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करताना समाजाचाच भाग असलेल्या मनोविकलांग महिलांशी आपुलकीचा संवाद साधता आला, त्यांना मदतीचा हात देता आला हा मोठा आनंद आहे. जिव्हाळा ग्रुप हा महिलांना निखळ आनंद मिळवून देण्याबरोबरच समाजाप्रती बांधिलकी जपण्याचेही उद्दीष्ट ठेवून कार्यरत आहे. निराधार मनोविकलांग महिलांची काळजी घेणारा मनगाव येथील डॉ.धामणे दाम्पत्याचा प्रकल्प खर्‍या अर्थाने मानवसेवेचे मंदिर आहे. त्यांच्या कार्यास भविष्यातही मदत करण्याचा प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन जिव्हाळा ग्रुपच्या संस्थापिका, संचालक अल्पना कासवा यांनी केले.

नगर शहर व परिसरातील महिलांचा सहभाग असलेल्या जिव्हाळा ग्रुपच्या महिला सदस्यांनी यंदाचा देशाचा स्वातंत्र्यदिन देहरे येथील मनगाव प्रकल्पाला भेट देवून साजरा केला. अतिशय उत्साही वातावरणात सर्वांनी या प्रकल्पातील महिलांनाही स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अल्पना कासवा, अर्चना सोळंकी, स्वाती वाघ, वीणा जगताप, अर्चना बाफना, सीमा शेटिया, सविता काळे, सुवर्णा डागा, नीता मुनोत, अर्चना कटारिया आदी उपस्थित होते.

जिव्हाळा ग्रुपच्या महिलांचे एक मोठे कुटुंबच तयार झाले आहे. विविध उपक्रमातून ते स्वत: आनंद घेतात. याबरोबरच समाजाचेही काही देणं लागतो या भावनेने सामाजिक कार्यही तितक्याच उत्स्फूर्तपणे करीत आहेत. स्वातंत्र्यदिनी त्यांनी मनगाव प्रकल्पातील महिलांसाठी विविध आवश्यक गरजेच्या वस्तूंची भेटही दिली. डॉ.राजेंद्र धामणे व डॉ.सुचेता धामणे यांच्या कार्याला जिव्हाळा ग्रुपच्यावतीने सलाम करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post