महामार्ग पोलिसांना स्ट्रेचर व प्रथमोपचार साहित्य भेट

 *महामार्ग पोलिसांना स्ट्रेचर व प्रथमोपचार साहित्य भेट*नगर ः इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर फंडातून महामार्ग पोलिसांना अपघातातील जखमींना तत्काळ उपचारासाठी 50 स्ट्रेचर व 50 प्रथमोपचार पेटी असे साहित्य भेट देण्यात आले. इंडियन ऑईल कंपनीचे मुख्य सरव्यवस्थापक संजय पाध्ये यांच्याहस्ते महामार्ग विभागाचे पोलिस निरीक्षक शंकर शिंदे व सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत गिरी यांना हे साहित्य सुपूर्द करण्यात आले.

अकोळनेर येथील इंडियन ऑईलच्या डेपोमध्ये साहित्य प्रदानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे मुख्य सरव्यवस्थापक संजय पाध्ये, एचआर व्यवस्थापक पी.के.सक्लेचा, मुख्य डेपो प्रबंधक आर.नीलकंठन, महामार्ग पोलिस विभागाचे पोलिस निरीक्षक शंकर शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत गिरी उपस्थित होते.

सरव्यवस्थासपक पाध्ये म्हणाले, अपघात झाल्यास तुमच्या पाठीशी असल्याची भूमिका महामार्ग पोलिसांची आहे. महामार्ग पोलिसांचे करावे तेवढे कौतुक  कमी आहे.  अपघातातील लोकांचे जीव ते वाचतात. जखमींना उपचारासाठी आज जे साहित्य दिले, त्याचे आम्हाला समाधान वाटत आहे.  व्यवस्थापक सकलेचा म्हणाले, वाहने चालविताना सावधान बाळगली पाहिजे. अपघात झाल्यास जखमींना उपचारासाठी या साहित्याचा उपयोग होणार आहे

. पोलिस निरीक्षक शिंदे म्हणाले,  मृत्यूंजय दूतांना जखमींना रुग्णालयात पोहोच करण्यासाठी साधने लागतात. या साहित्यामुळे महामार्ग पोलिसांची ताकद वाढली आहे. याबद्दल इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे त्यांनी आभार मानले. निरीक्षक गिरी म्हणाले, महामार्गालगत असणार्‍या गावातील मृत्यूंजय दूतांना हे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जेणेकरून जखमींना उपचारासाठी मदत होणार आहे.

मा भूषणकुमार उपाध्याय अपर पोलीस महासंचालक वाहतूक ,यांचे संकल्पनेतील ही योजना ,मा संजय जाधव पो अधीक्षक महामार्ग पुणे विभाग ,मा प्रीतम यावलकर पो उपअधीक्षक महामार्ग पोलीस पुणे विभाग व शंकर शिंदे पोलीस निरीक्षक महामार्ग पोलिस अहमदनगर यांचे मार्गदर्शन खाली हायवे मृत्यूनजय दूत योजना 1 मार्च 2021 रोजीपासून राबवली जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post