बंदी असताना नगर जिल्ह्यात बैलगाडा शर्यत....४७ जणांवर गुन्हा दाखल

बंदी असताना बैलगाडा शर्यत....४७ जणांवर गुन्हा दाखलनगर :  राज्यात बैलडागा शर्यतीचे आयोजन करण्यास बंदी आहे. तसेच राज्यात सध्या कोरोना प्रतिबंधक नियम लागू असल्यामुळे गर्दी जमवण्यास मज्जाव आहे. असे असतानादेखील संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीमध्ये झालेल्या गर्दीचे काही व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

कोरोना नियमाचे उल्लंघन तसेच बंदी असतानाही बैलगाडा शर्यत आयोजित केल्याप्रकरणी येथे एकूण 47 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पैकी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यामध्ये अहमदनगर तसेच पुणे जिल्ह्यातील काही लोकांचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post