राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस अंबादास गारूडकर यांना मातृशोक

 अंबादास गारुडकर यांना मातृशोक

शतायुषी भागुबाई गारुडकर यांचे वृद्धपकाळाने निधन     नगर -  प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस तसेच महात्मा फुले समता परिषदेचे राज्य सरचिटणीस अंबादास गारुडकर यांच्या मातोश्री श्रीमती भागुबाई बबनराव गारुडकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या 100 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर केडगांव येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.

     स्व.भागुबाई गारुडकर यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या.  त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्यासह आ.संग्राम जगताप, माजी आ.दादाभाऊ कळमकर, घनश्यामअण्णा शेलार आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री.अंबादास गारुडकर यांचे सात्वंन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post