मोठी कारवाई...८० लाखांचा ५१० किलो गांजा जप्त

 

मोठी कारवाई...८० लाखांचा ५१० किलो गांजा जप्त

 


नगर : लोणी परिसरातील लोणी-संगमनेर रोडवर एका महिंद्रा पीकअप गाडीतून जात असताना गस्त घालत असलेल्या पोलिसांनी संशय आला. या गाडीचा पोलिसांनी पाठलाग करुन गाडी थांबविली.

या गाडीची झाडाझडती घेतली असता या गाडीत 80 लाख रुपये किंमतीचा 510 किलो गांजा पोलिसांनी हस्तगत करुन यातील दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी येथील संगमनेररोडवर  चंद्रापूर  शिवारात सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस नाईक, दिपक रोकडले व पोलीस नाईक कैलास भिंगारदिवे हे चंगस्त घालत असताना त्यांच्या शेजारुन एक महिंद्रा कंपनीची पीकअप गाडी एमएच 25पी 1294 या क्रमांकाची गाडी संशयित स्थितीत पोलिसांना दिसली.

पोलिसांनी सदर गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पिकअपच्या चालकाने गाडी न थांबवता जोराने निघुन गेला. मात्र लोणी पोलिसांनी या पीकअपचा पाठलाग करत गाडी थांबविली. पीकअपमधील लोकांना याबाबत विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पुन्हा पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी या गाडीची झाडाझडती घेतली असता या पीकअपमधून सुमारे 80 लाख 1000 रुपये किंमतीचा 510 किलो गांजा आढळून आला. सदरचा गांंजा हा भुशाच्या पोत्याखाली लपवून घेवून चालले होते. यात 210 किलो 75 लाख रुपयांचा गांजा तसेच पीकअप अंदाजे 3 लाख रुपयाचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post