पत्नीचा अघोरी पद्धतीने छळ, उद्योजक गायकवाड पितापुत्राला अखेर अटक

 पत्नीचा अघोरी पद्धतीने छळ, उद्योजक गायकवाड पितापुत्राला अखेर अटकपुणे :  दीड महिन्याच्या तपासानंतर पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेले फरार आरोपी प्रसिद्ध उद्योगपती गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड यांना उडपीमधून अटक करण्यात आली आहे. पत्नीला सिगरेटचे चटके देऊन मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच बलात्कार, खंडणी आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे देखील दाखल दाखल करण्यात आले होते. अखेर पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी गायकवाड कुटुंबावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या गायकवाड कुटुंबीयांची औंधमध्ये कोट्यवधींची मालमत्ता आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post