केंद्र सरकारने लॉन्च केले 'फिट इंडिया' मोबाईल ॲप... सर्वांना मोफत उपलब्ध

 

आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी फिट इंडिया मोबाईल ॲप सुरु केले

“फिट इंडिया हे मोबाईल ॲप 135 कोटी भारतीयांसाठी सुरु केलेले तंदुरुस्तीसाठीचे भारताचे सर्वात व्यापक ॲप आहे” : अनुराग ठाकूर


नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2021

महत्त्वाची वैशिष्ट्ये :

  • हे ॲप मोफत मिळणार आहे पण ते आपल्या तंदुरुस्तीसाठी मौल्यवान ठरणार आहे : अनुराग ठाकूर
  • फिट इंडिया ॲप नव्या भारताला तंदुरुस्त भारत  बनविण्यासाठी सहाय्यक ठरेल : निशीथ प्रामाणिक
  • या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी भारतीय हॉकी संघाचा कप्तान मनप्रीत सिंगमुष्टीयोद्धा संग्राम सिंगक्रीडा पत्रकार अयाझ मेमन आणि पायलट कॅप्टन ॲनी दिव्या यांच्यासह इतरांशी आभासी पद्धतीने संवाद साधला.
  • फिट इंडिया ॲप हे मोफत उपलब्ध असलेले ॲप असून अँड्रॉईड आणि आयओएस अश्या दोन्ही प्रणालींच्या मंचावर ते इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे.
  • फिट इंडिया चळवळीसारख्या विविध उपक्रमांमध्ये सार्वजनिक पातळीवर भाग घेऊन ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन ठाकूर यांनी देशवासियांना केले.                                                                                                                  

फिट इंडिया चळवळीचा दुसरा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ चा भाग म्हणून केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आजच्या क्रीडादिनाला नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडीयम येथे झालेल्या कार्यक्रमात फिट इंडिया ॲपची सुरुवात केली.

या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी भारतीय हॉकी संघाचा कप्तान मनप्रीत सिंगमुष्टीयोद्धा संग्राम सिंगक्रीडा पत्रकार अयाझ मेमन आणि पायलट कॅप्टन ॲनी दिव्या यांच्यासह इतरांशी आभासी पद्धतीने संवाद साधला.

फिट इंडिया ॲप हे मोफत उपलब्ध असलेले ॲप असून अँड्रॉईड आणि आयओएस अश्या दोन्ही प्रणालींच्या मंचावर ते इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे. या ॲपचा वापर अत्यंत मूलभूत स्मार्टफोनद्वारे देखील करता आला पाहिजे हे लक्षात घेऊनच त्याची रचना करण्यात आली आहे.

फिट इंडिया चळवळीच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त तसेच राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन करतकेंद्रीय मंत्री म्हणालेफिट इंडिया मोबाईल ॲप प्रत्येक भारतीयाला त्याच्या तंदुरुस्तीची पातळी तपासण्याची सोय अगदी त्याच्या हातात आणून देते. या ॲपमध्ये ‘फिटनेस स्कोअर’अनिमेटेड व्हिडिओशारीरिक हालचालींवर लक्ष ठेवणारा ट्रॅकर आणि प्रत्येकाच्या व्यायामाची विशिष्ट गरज पूर्ण करणारा ‘माय प्लॅन’ अशी काही अत्यंत वैशिष्ट्ये आहेत.

अतिरिक्त वैशिष्ट्ये:-

प्रत्येकाचे वयलिंगवर्तमान जीवनशैली आणि शरीर रचना यावर आधारित प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न सेवन करीत असतोशारीरिक क्रियाकलाप करतो आणि त्यानुसार त्याला हायड्रेशनची आवश्यकता असते. फिट इंडिया मोबाईल अप्लिकेशनमधील My Plan (माय प्लॅन) हे वैशिष्ट्य प्रत्येकाला त्याचे / तिचे ध्येय गाठण्यासाठीआपापली वर्तमान जीवनशैली – व्यायामासाठी दिलेला वेळप्यायलेले पाणीझोपेचे तासवर्तमान वजन आणि उद्दिष्ट ठेवलेले वजनवैयक्तिक गरजेनुसार दिलेले आहाराचे नियोजनजीवनशैलीतील बदल याबाबतची माहिती देते. फिट इंडिया अप्लिकेशन हे भारतीय पद्धतीचे आहार नियोजनकिती ग्लास पाणी प्यावे आणि किती तास झोप घ्यावीहे सुचविते.  

कोणालाही आपल्या दैनंदिन वैयक्तिक क्रियाकलापांच्या (शारीरिक व्यायाम) पातळीचा पाठपुरावा करण्यासाठी अक्टिव्हिटी ट्रॅकर हे वैशिष्ट्य मदत करते. रियल टाइम स्टेप ट्रॅकरमुळे व्यक्तीला आपल्या रोजच्या चालण्याचा पाठपुरावा करण्यासाठी आणि स्वतःसाठी मोठी ध्येये डोळ्यासमोर ठेवण्याबाबत प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त आहे. या अप्लिकेशनमुळे  व्यक्तीला त्यांचा दैनंदिन पाणी पिण्याचाकॅलरी सेवनाचा आणि झोपेच्या तासांचा पाठपुरावा देखील करता येणार आहे.

व्यक्तीला तासिकांच्या स्वरूपात या अप्लिकेशनमध्ये आपल्या फिटनेस स्कोअरची प्रगती तपासून पाहण्यासाठी रिमाइंडर लावता येणार आहे आणि ठराविक कालावधीत दैनंदिन व्यायाम करणेइतर अधिकाधिक लोकांना फिटनेसबाबत प्रोत्साहन देण्यासाठी तसेच जीवनशैलीतील बदलांसाठी उद्युक्त करण्यासाठीव्यक्तीला त्यांचा फिटनेस आणि क्रियाकलापांची सविस्तर माहिती इतरांबरोबर शेअर करणे शक्य होणार आहे.

फिट इंडियाच्या विविध कार्यक्रमांमध्येप्रमाणित उपक्रम इत्यादींमध्ये सहभागी होण्याची संधी या अप्लिकेशनमुळे व्यक्तींनाशाळांनागटांना आणि संस्थांना संधी आहेलोकांना त्यांच्या फिटनेसबाबतच्या यशस्वी कथा देखील या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इतरांना सांगता येऊ शकतील.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post