भूसंपादनास विरोध; शेतकऱ्यांचे एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण

 भूसंपादनास विरोध; शेतकऱ्यांचे एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषणनगर - नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी व वडगाव गुप्ता येथील नियोजित औद्योगिक क्षेत्र विस्तारीकरणासाठीच्या भूसंपादनास येथील बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत काल औद्योगिक महामंडळाच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले. महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांनी भेट घेऊन सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात क्षेत्र वगळण्याबाबत स्थळपाहणी समितीचा दौरा निश्चित करण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. 
पिंपळगाव माळवी व वडगाव गुप्ता परिसरातील शेतकरी अगोदरच अल्पभूधारक आहे. त्यांच्या बऱ्याच शेतजमिनी एमआयडीसीमध्ये गेलेल्या आहेत. परिसरातील जमीन बागायती असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता पुन्हा होणान्या भूसंपादनास विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील शासनाचे नाव काढण्यासाठी बुधवारी १८ ऑगस्ट रोजी औद्योगिक महामंडळाच्या एमआयडीसी येथील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी सातबारा उताच्यावर शासनाचे नाव लागल्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही व कुठलीही बँक कर्ज देत नाही, त्यामुळे हे नाव काढावे, यासाठी शेतकरी बचाव कृती समितीचे
बेमुदत उपोषन प्रकाश डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. उपोषणामध्ये विजय डोंगरे, बाळासाहेब शेवाळे, रामनाथ झिने, शिवाजी डोंगरे,
एकनाथ मोरे, रावसाहेब शेवाळे, परसराम गुंड, लक्ष्मण गुंड, बाळासाहेब कसबे, रामदास जाधव, नवनाथ भोसले, जालिंदर गुंड आदी सहभागी होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post