करोना संसर्ग जास्त असलेली गावे बंद करा, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे स्पष्ट निर्देश

 जामखेड तालुक्यातील फक्राबादमध्ये तालुकास्तरीय कोरोना आढावा बैठक संपन्न 



जामखेड (नासीर पठाण) : जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आज संयुक्तपणे जामखेड तालुक्याला दौरा केला. जामखेड तालुक्यातील ज्या गावांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक आहे अश्या गावांसह संपुर्ण तालुक्याची आढावा बैठक जामखेड तालुक्यातील फक्राबादमध्ये आज घेण्यात आली. 


या बैठकीच्या माध्यमांतून जिल्हा प्रशासनाने जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना का वाढतोय याची कारणे सरपंचांकडून जाणून घेतली. बैठकीत लग्नसोहळे, आखाड पार्ट्या, जत्रा, जागरण गोंधळ, कामगार वर्ग, सह आदी धार्मिक कार्यक्रमांमुळे कोरोना वाढत असल्याचे गाव कारभार्यांनी निदर्शनास आणून दिले. 


जामखेड तालुक्यातील ज्या गावांमध्ये कोरोना वाढला आहे ती गावे बंद करून कठोर उपाययोजना हाती घ्या.  जिथे कुणी स्थानिक प्रशासनाला सहकार्य करत नाहीत त्यांच्यावर तालुका प्रशासनाने कठोर कारवाई करावी. इथून पुढे होम आयसोलेशन बंद राहणार आहे. सर्वांना उपचारासाठी जामखेडला दाखल करा. ज्या गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे ती गावे बंद ठेवा. कठोर उपाययोजना राबवा. कोरोना नियमांचे पालन करण्यात ज्या गावातील व्यापारी व दुकानदार सहकार्य करत नाहीत त्यांच्या अस्थापना कोरोना संपेपर्यंत सीलबंद करा असा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना आज दिले.

प्रतिनिधी नासीर पठाण सह कॅमेरामन अशोक वीर जामखेड .


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post