मंत्रालयात थेट शरद पवारांचा फोन.... मागणी ऐकून अधिकारी चक्रावले... नंतर झाला धक्कादायक उलगडा ‌

 शरद पवार यांचा आवाज काढून मंत्रालयात फोन...दोघांना अटकमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून या दोन्ही आरोपींना जेरबंद केले. विकास गुरव ( 51 ) आणि किरण काकडे ( 26)  अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने या दोघांचीही 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास गुरव आणि किरण काकडे दोघेही पुण्यातील रहिवाशी आहेत. ते सध्या बेरोजगार आहेत. यापैकी किरण काकडे याने लॅन्डलाईन क्रमांकावरुन मंत्रालयात फोन केला होता. आपण शरद पवार बोलत असून एका अधिकाऱ्याची तात्काळ बदली करा, असे फर्मान मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिले होते. त्यावेळी आपण सिल्व्हर ओकवरून बोलत असल्याचे आरोपीने म्हटले होते. मात्र, शरद पवार त्यावेळी दिल्लीत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी चौकशी केली असता बनाव उघडकीस आला होता. त्यानंतर गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करुन तपासाला सुरुवात झाली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post